पुणे महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष,उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी निवडणुकीतील यशाबद्दल मार्गदर्शन व आशीर्वाद घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांचे अभिनंदन करत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरी सुविधा सुधारण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचा सल्ला दिला. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जबाबदारीने आणि पारदर्शकपणे कार्य करावे, असे मार्गदर्शन केले.

नगरसेवक हर्षवर्धन मानकर यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त करत आणि पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाच्या नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार,” अशी ग्वाही दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांच्या शुभेच्छांमधून मिळालेली प्रेरणा आणि आशीर्वाद माझ्यासाठी मोठी ताकद असून, रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागातील जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे त्यांचे मत आहे.
या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पुणे शहराच्या विकासासाठी सकारात्मक आणि प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.



