पुणे शहर

“उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री झाल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिलेबी भरवत, फुगडी खेळत, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला” 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवड झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला. पुणे शहरातील पक्ष कार्यालय, नारायण पेठ येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जिलेबी वाटत, फटाके फोडून, महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ “एकच वादा,अजित दादा” “अजितदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” “ दादाचा वादा आणि बळ” अशा जोरदार घोषणाबाजी सुद्धा  करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, “उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने जिल्ह्याच्या विकासात अजून भर पडणार आहे. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याने झालेल्या लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणुकीमध्ये जोमाने व प्रामाणिकपणे काम करीत महायुती सरकारला अधिक बळकट केलेलं आहेत.
आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महामंडळ, विशेष कार्यकारी अधिकारी, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कमिटी यांवर काम करण्याची संधी मिळाल्यास पक्षातील कार्यकर्त्याला न्याय मिळेल व पक्ष वाढीसाठी मदत होईल.

महानगरपालिका निवडणूक महायुती मध्ये लढवायची हा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेतील. मात्र आपणही महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. पक्ष वाढीसाठी आपणही रस्त्यावर उतरून पक्ष संघटनेची कामे केली पाहिजेत.  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पाचवेळा पुण्याचे पालकमंत्री झालेले आहेत. अनेक वर्षांपासून ते जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा आहे. शहरासह ग्रामीण भागातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न, नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्या, कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे याची त्यांना माहिती आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने विविध विकासकामांना आणखी गती मिळणार आहे.  असेही मानकर म्हणाले.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

सदरप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख,प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, मा.महापौर दत्ता धनकवडे, सांस्कृतिक प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, मा.विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, मा.नगरसेविका सुषमा निम्हण, शशिकला कुंभार, शुक्राचार्य वांजळे,  युवती अध्यक्ष पूजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे, दिव्यांग अध्यक्ष पंकज साठे, माहिती अधिकार अध्यक्ष दिनेश खराडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष चंद्रहास शेट्टी, विधानसभा मतदारसंघाचे वडगावशेरी अध्यक्ष सतीश म्हस्के, पर्वती अध्यक्ष संतोष नांगरे, कसबा अध्यक्ष अजय दराडे, खडकवासला ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र पवार, पुणे कँन्टोनमेंट अध्यक्ष नरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये