मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत बालेवाडी ग्रामस्थांच्या सूचना व प्रस्तावावर आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढणार – अमोल बालवडकर

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या संकल्पनेतुन व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis यांच्या माध्यमातुन खर्या अर्थाने पुणे शहराला नदी सुधार प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. आज बालेवाडी येथे नदी सुधार प्रकल्पाच्या बाबतीत बालेवाडी ग्रामस्थ व पुणे मनपाचे प्रकल्प अधिकारी बिपीन शिंदे तसेच त्यांच्या सहकार्यांसमवेत माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांची महत्वाची बैठक संपन्न झाली.
यावेळी अमोल बालवडकर म्हणाले, या प्रकल्पाकरीता असलेल्या भुसंपादनाबाबतीत चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी संपादित होत असलेल्या जमिन मालकांच्या काही शंकांचे व त्याबदल्यात देण्यात येणार्या मोबदल्यासंदर्भात प्रकल्प अधिकार्यांकडुन निरसन करण्यात आले. यावेळी संबंधित जागा मालकांनी सुचवलेल्या काही प्रस्तावांबाबत व सुचनांबाबत आपण स्वतः मा.महापालिका आयुक्त तसेच संबंधित विभागाकडे जाऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासित केले.
निश्चितच या नदी सुधार प्रकल्पामुळे नदीसह परिसराचा देखिल कायापालट होणार आहे यात शंका नाही. हा प्रकल्प होत असतानाच नदीच्या कडेला असलेला प्रस्तावित २४ मी. डिपी रस्ता देखिल तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. असेही अमोल बालवडकर म्हणाले.



