कोथरुड

कोथरूडमध्ये भाजप युवा मोर्चा संघटन बळकट करणार ; अमित तोरडमल यांची युवा मोर्चा कोथरूड मतदार संघाच्या अध्यक्षपदी निवड

कोथरूड: भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूड मतदार संघाच्या अध्यक्षपदी अमित तोरडमल यांची निवड करण्यात आली आहे. याआधी तोरडमल यांनी प्रभाग अध्यक्ष म्हणून काम केले आहे. पक्षाने मतदार संघाच्या युवा मोर्चा अध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे तोरडमल यांनी निवडीनंतर सांगितले.

कोथरुड मतदार संघाची कार्यकारणी भारतीय जनता पार्टी कोथरुड मतदार संघाच्या अधिकृत पेज वरून जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कोथरुड विधानसभा (द) युवा मोर्चा अध्यक्ष पदी अमित तोरडमल व त्यांच्या सोबत सरचिटणीस म्हणून कुणाल तोंडे, पार्थ मटकरी व तुषार जाधव यांची निवड करण्यात आली. ही निवड कोथरूड मतदार संघाचे ( द ) अध्यक्ष डॉ.संदीप बुटला यांनी केली.

अमित तोरडमल म्हणाले मतदार संघाचे युवा मोर्चाचे आधीचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी चांगल्या पद्धतीने मतदार संघात युवा मोर्चाची बांधणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त युवक पक्षाशी जोडून युवा मोर्चाचे संघटन बळकट करणार आहे.

Img 20230717 wa0012281294517541507444836162

भाजप कोथरूड मतदार संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे

उपाध्यक्ष : अश्विनी ढमाले, ॲड. अशोक प्रभुणे
दिनेश माथवड, सचिन मोकाटे, हेमंत बोरकर, दिनेश माझिरे, विशाल रामदासी, संदिप मोरे, रणजित हारपुडे, प्रदिप जोरी, शंतनु खिलारे, ॲड. रुपेश भोसले.

सरचिटणीस :  मंजुश्री खर्डेकर (प्रभारी महिला मोर्चा)
अनुराधा येडके, गिरीश खत्री, विठ्ठल बराटे, सचिन पवार
श्रीधर मोहोळ, दिपक पवार

चिटणीस : सुरेखा जगताप, संतोष बराटे दत्ता भगत, अभिजीत गाडे, संतोष घारे, अजित शिगवण, सुयोग बरके, अतुल शिंदे, आदित्य सिंग, रमेश चव्हाण,निर्मला रायरीकर, विजय राठोड

युवा मोर्चा  अध्यक्ष : अमित तोरडमल
सरचिटणीस : कुणाल तोंडे, तुषार जाधव, पार्थ मटकरी
युवती आघाडी अध्यक्ष:  मानसी गुंड

महिला आघाडी अध्यक्षा : कांचन कुंबरे
सरचिटणीस : केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ,
सुप्रिया माझिरे, विद्याताई टेमकर

ओबीसी आघाडी अध्यक्ष : राज तांबोळी

अनुसूचित जाती मोर्चा आघाडी अध्यक्ष : सुहास साठे

व्यापारी आघाडी अध्यक्ष : रवींद्र सुरुक सरचिटणीस : बाळासाहेब विचारे

जेष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष : कमलाकर भोंडे

झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष : बाळू दांडेकर

Img 20230511 wa0002282292294772633607891151

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये