पुणे शहर

अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे कोथरूड मध्ये “खेळ रंगला पैठणीचा व मंगळागौर” कार्यक्रमांचे दि.17 ऑगस्ट रोजी आयोजन 

पुणे : अमोल बालवडकर फाऊंडेशनतर्फे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील समस्त माता भगिनींसाठी “खेळ रंगला पैठणीचा व मंगळागौर” कार्यक्रम शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता पंडित फार्म, डी. पी. रोड, कोथरूड येथे संपन्न होणार आहे. 

या कार्यक्रमात “सुख म्हणजे नक्की काय असतं” मालिका फेम माधवी निमकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सादरकर्ते सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय हे असणार आहेत. आकर्षक बक्षिसे, लकी ड्रॉ कूपन आणि प्रत्येक उपस्थित भगिनिला आकर्षक भेट वस्तू देखील दिली जाणार आहे. प्रथम बक्षीस TVS Scooty Zest, द्वितीय बक्षीस सॅमसंग LED TV, तृतीय बक्षीस LG फ्रिज, चतुर्थ बक्षीस Godrej वॉशिंग मशीन आणि पाचवे बक्षीस हे फिलिप्स चे मिक्सर असणार आहे. 

Img 20240813 wa0014

तरी जास्तीत जास्त महिला भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि वरील आकर्षक बक्षिसे जिंकावीत व मनसोक्तपणे कार्यक्रमाचा आनंद लुटावा. अधिक माहितीसाठी संपर्क: 

8307079494- नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर जनसंपर्क कार्यालय, पुष्पनगरी बिल्डिंग, कृष्णा हॉस्पिटल समोर, रामबाग कॉलनी, पौड रोड, कोथरूड

नियम व अटी:

१) या कार्यक्रमात प्रथम येणाऱ्या महिलेस प्राधान्य असणार आहे. 

२) लकी ड्रॉ हाजिर तो वजीर पद्घतीने काढण्यात येणार आहे 

३) येताना फॉर्म सोबत घेऊन येणे आणि प्रवेश ठिकाणी ही लकी ड्रॉ कूपन मिळेल.

४) महिलांसाठी खास गाणी, गप्पा, गोष्टी कार्यक्रम

५) लकी ड्रॉ व खेळाचे नियम आणि अधिकार आयोजकांकडे राखीव असतील.

Fb img 16474137115315333568191096823716
Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये