बावधन मध्ये महिलांनी एकत्र येऊन बसवलेल्या सिद्धीच्या गणपतीची आजची आरती अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार

बावधन : बावधन च्या माजी सरपंच पियुषा किरण दगडे पाटील आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि “घे भरारी” समूहातील महिलांनी मिळून महाराष्ट्रात प्रथमच महिलांनी महिलांसाठी बसवलेल्या siddhicha ganapati “सिद्धीच्या गणपती” ची आरती आज Amruta Fadanvis अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेता आकाश ठोसर आणि पुणे जिल्ह्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आज सोमवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सायं. ७ वाजता ही आरती संपन्न होणार आहे.
बावधन बुद्रुक मधील सूर्यदत्ता कॉलेजच्या समोरील मैदानावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांनी एकत्र येत सिद्धीच्या गणपतीची स्थापना करत एक नवा आदर्श समाजासमोर मांडला आहे.













