कर्वेनगर परिसरातील शाळेत ११ वर्षाच्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार.. नृत्य शिक्षकाला अटक

कर्वेनगर (Karvenagar in Pune) परिसरातील एका नामांकित शाळेत 11 वर्षीय विद्यार्थ्यांवर (on 11-year-old students)डान्स टीचरकडून लैंगिक अत्याचार (Sexual abuse by a dance teacher) झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

शाळेत समुपदेशन सुरू असताना विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनंतर हा प्रकार समोर आला आहे. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर आहे. नृत्य शिकवताना याने विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावला. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याने हीच माहिती आपल्या आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शिक्षकाला अटक केले आहे. संबंधित शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांवर देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वारजे माळवाडी पोलिसांना देण्यात आले आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चारित्र पडताळणी केली होती का ? असा सवालही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला आहे. भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी देखील कर्वेनगर पोलीस चौकीत या संदर्भात निवेदन देत संबंधित विषयाचे सखोल चौकशी करत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या घटनेचा निषेध नोंदवला आहे.









