मुरलीधर मोहोळ आणि कुटुंबीयांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट,एका कार्यकर्त्याला आणखी काय हवं असतं? स्वप्नपूर्तीचा आणखी एक क्षण…

नवी दिल्ली : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी आज आम्हा मोहोळ कुटुंबियांना मिळाली. संसदेचे अधिवेशन सुरु असताना त्यांनी अत्यंत व्यस्त असताना सुध्दा दिलेला वेळ कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सुखावून गेला. माझी आई, पत्नी, मुली, भाऊ आणि कुटुंबातील प्रत्येकाशी मोदीजींनी संवाद साधला. प्रत्येकाशी मराठीतून केलेली विचारपूस आणि खुशाली विचारताना स्पष्ट दिसलेली आत्मीयता भावणारी होती. अशी प्रतिक्रीया केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
मोहोळ म्हणाले, भारतीय जनता पार्टीत काम करायला सुरुवात केल्यापासून तर आजपर्यंत कुटुंबियांनी मला अविरत साथ दिली. त्या कुटुंबियांना पार्टीच्या आणि देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाशी थेट आपुलकीचा संवाद होतो, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होतं.मोदीजींचे आम्हा मोहोळ कुटुंबियांच्या वतीनं मनापासून धन्यवाद ! आभार मानण्याऐवजी त्यांच्या ऋणात राहूनच धन्यवाद व्यक्त करतो. भाजपा ही केवळ पार्टीच नाही, तर परिवार आहे, याची आणखी अनुभूती देणारे क्षण आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील !










