पुणे शहर

इनिशिअल काँट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशन संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पदनियुक्ती कार्यक्रम संपन्न

पुणे : इनिशिअल काँट्रॅक्टर्स वेलफेअर असोसिएशन या संस्थेची प्रथम सर्व साधारण सभा व पदनियुक्ती कार्यक्रम कोथरूड मध्ये नुकताच पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा व नगरसेवक किरण दगडे पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व पुणे  जिल्ह्यातील १४ तालुके या मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असून ठेकेदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे असे संस्थेचे अध्यक्ष रुपेश देशवारे यांनी सांगितले .

Img 20201114 wa0195

या मध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये अभिजित गाडे – सरचिटणीस पुणे जिल्हा ,सचिन नगरकर – सेक्रेटरी पुणे जिल्हा , नितीन साळुंके – उपाध्यक्ष पुणे जिल्हा, गणेश कडलग – उपाध्यक्ष पुणे जिल्हा या नियुक्त्या करण्यात आल्या.

यावेळी कार्यक्रमास सेक्रेटरी अब्दुल सौदागर, अंबरनाथ चे अध्यक्ष शेखर सर, कोअर कमिटी सदस्य जॉन क्लेमंट,  जयकुमार बेलसरे – यश अर्थिंग सोल्युशन्स प्रा. लि.,
आकाश कातुरे, नवनाथ वांजळे,विजय राठोड उपस्थित होते.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष किशोर कुलकर्णी , सरचिटणीस अभिजित गाडे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन रुपेश भोसले यांनी केले.

Img 20201118 wa0057

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये