पुणे शहर

कोथरूड, कर्वेनगर मध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नशा मुक्ती जनजागृती अभियान

क्षेत्रिय कार्यालय व पोलीस प्रशासनाचा उपक्रम

कोथरूड : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवसानिमित्त कोथरूड, कर्वेनगर, परिसरात नशा मुक्ती जनजागृती अभियान राबवण्यात आले. या अभियाना अंतर्गत जनजागृती रॅली, पथनाट्य या माध्यमातून नशा मुक्ती संदर्भातील सामाजिक संदेश पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी ही या अभियानात सहभागी झाले होते.

कोथरूड बावधन व वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभाग, पुणे शहर पोलीस आयुक्तालय अलंकार पोलीस स्टेशन, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, मामासाहेब मोहोळ महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, नेहरू युवा, सरस्वती विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ” जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन व स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२३” अनुषंगाने ही नशा मुक्ती जनजागृती अभियान फेरी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमात डहाणूकर कॉलनी येथील किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियनच्या कार्यालयात २०० शालेय व महाविद्यालयीन युवकांच्या उपस्थितीमध्ये नशा मुक्ती विषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तसेच वारजे कर्वेनगरच्या ब्रँड अँबेसिडर रूपाली मगर व कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे ब्रँड अँबेसिडर मोकादम वैजीनाथ गायकवाड तसेच शिक्षक कैलास सरतापे यांनी नशा मुक्ती विषयी महाविद्यालयीन व शालेय तरुणांना मार्गदर्शन केले.

Img 20221228 wa00016208176808646242256

यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी शालेय व महाविद्यालयीन तरुणांनी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने विडी, सिगारेट, दारू, कोकेन, पिणार नाही व अन्य मी कोणत्याही प्रकारची शरीराला घातक अशा नशा करणार नाही व इतरांनाही करू देणार नाही अशी शपथ घेण्याचे आवाहन केले.

मोकादम वैजीनाथ गायकवाड म्हणाले भारत देशातील तरुण वर्गात नशा करण्याच्या सवयी मध्ये वाढ झाल्यामुळे ३७% टक्के तरुण वयाच्या ४५ वर्षाच्या आतच मृत्युमुखी पडतात. हे मृत्यूचे प्रमाण पहाता अतिशय दुःखदायक व वेदनादायक घटना मानावी लागेल. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. जर आजच्या तरुण तरुणीने सरकारवर दबाव आणून संपूर्ण देशात नशा खोरीचे जे उत्पादन आहे ते बंद करा म्हणून सामाजिक चळवळ उभी करणे गरजेचे आहे. देशाला जागतिक महासत्ता म्हणून उदयास आणायचे असेल तर तर तरुणांनी निर्व्यसनी राहून आपले जीवन घडवणे आवश्यक आहे.”

Img 20230707 wa00097391429386569165714

यावेळी रॅली मध्ये चार्लीच्या भूमीकेतून जेष्ठ कलाकारांनी पथनाटय व गायनाच्या माध्यमातून नशा मुक्ती संदर्भात जनजागृती केली. तसेच गुटखा खाऊ नका, आपले आरोग्य धोक्यात आणू नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकून परिसर घाण करू नका, अशा घोषणाही देण्यात आल्या.

Img 20230708 wa0003

नशा मुक्ती जनजागृती अभियान प्रचार फेरी डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, हॅपी कॉलनी, कोथरूड गांवठाण, गोसावी वस्ती परिसरात काढण्यात आली. सदर अभियान महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे, राजेश गुर्रम, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शानाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, गणेश खिरिड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, सचिन , वैभव घटकांबळे, प्रशांत दामले, यांच्या निरिक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, कृष्णा धनगर, अशोक खुडे विशेष सहकार्य आम्रपाली चव्हाण, भारत दिगोळ जनसेवक बाळू दांडेकर, वीरप्रभू, शेळके, भारती कांबळे, यश थोरात यांचे विशेष योगदान लाभले. सदर अभियानात २०० शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणारे तरुण सहभागी झाले.

Img 20230511 wa0002281296351682306326034196

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये