महाराष्ट्र

नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी..

न्यायालयाने प्रभाग रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात एक महत्त्वाची इम बातमी समोर आली आहे.  नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे.  त्यामुळे आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुकांना मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे आता लवकरच निवडणुकांसंदर्भात निर्णय होऊ शकतो, निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्यानं आता नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह या निवडणुका जाहीर होऊ शकतात. नवीन वार्ड रचनेनुसारच या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245

राज्यातील महत्त्वाच्या माहापालिका मुंबई ,पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक महापालिका यांच्या प्रभाग रचनेमध्ये काही बदल करण्यात आले होते. नव्या प्रभाग रचनेला कोर्टात याचिका सादर करून आव्हान देण्यात आले होते. या याचिका आता न्यायालयानं फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता राज्यात नव्या प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये