पुणे शहरसांस्कृतिक

नाट्यगृह सुरू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात कलाकारांचे आंदोलन


पुणे : पुण्यातील संगीत, सिनेमा,नाटक, नृत्य,एकपात्री, ऑर्केस्ट्रा,लोकधारा, लावणी, जादूगर,साऊंड लाईट, बॅकस्टेज संघटनांच्यावतीने पुण्यातील नाट्यगृह व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे.यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, शरद सांस्कृतिक कला क्रीडा प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया, ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनचे योगेश सुपेकर, साऊंड लाईट इलेक्ट्रिकल असोसिएशनचे शैलेश गायकवाड, राजीव गांधी विचार मंडळ ट्रस्टचे विनोद नीनारिया, परिवर्तन कला महासंघाचे अध्यक्ष अमर पुणेकर, पप्पू बंड, चित्रसेन भवार तसेच शहरातील कलाकार उपस्थित होते.

यावेळी शंभर ते दीडशे लोकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्यावी. नाट्यगृह सुरू करावे.कलाकारांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी.कलाकारांना इतर लघुउद्योगास अनुदान द्यावे. कोरोना संकटकाळात प्रत्येक कलाकाराला दहा हजार रुपयांची तातडीने मदत करावी. कलावंतांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद असलेले स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास महामंडळ आपण करावे. अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये