महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजप कडून राज्यसभेची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे.
अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा झाली होती. याबाबत आज भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज होत्या. त्यांना आपली नाराजी अनेकदा बोलून दाखवली होती. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय.
अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असमार्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केलेय. त्याशिवाय ते कारसेवक आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत आहेत.













