पुणे शहर

पुणेकरांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा, 35 हजार कोटी रुपयांचे दोन मोठे प्रकल्प मंजूर

पुणे: पुणेकरांसाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खास दिवाळी भेट दिली आहे. पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.

Img 20231109 wa00081144410606180315579

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडून जिल्ह्यातील दोन मोठ्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. पुणे शहर वाढत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधा अपूर्ण ठरत आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहे. सुमारे 35 हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना गुरुवारी मंजुरी दिल्याची माहिती स्वत: नितीन गडकरी यांनी माध्यमांना ही माहिती दिली. यामुळे पुण्याच्या विकासात अधिकच भर पडणार आहे.

Img 20230717 wa0012281292712276676815194924

नितीन गडकरी यांनी मंजुरी केलेल्या दोन प्रकल्पांत एक प्रकल्प पुणे शहराशी संबंधित आहे. पुणे शहरातील रस्ता, उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प पुणे- छत्रपती संभाजीनगरमधील आहे. या दोन शहरांना जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. चाकण, तळेगावमार्गे हा रस्ता तयार होणार आहे. राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामार्फत हा महामार्ग तयार केला जाणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील दोन मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे शहराच्या विकासात मोठी भर पडणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील समस्यासंदर्भात नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकवेळा चिंता व्यक्त केली आहे. पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्पावर भर दिला जात आहे.

Img 20231109 wa00128330767081325070842

पुण्यात स्कायबसचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. स्काय बस, मेट्रो या प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहने कमी होऊन प्रदूषण कमी होणार आहे. तसेच पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेस इलेक्ट्रीक करण्यात येणार आहे.

पुणे शहरात 35 हजार कोटी रुपये खर्च करून दोन रस्ते प्रकल्प येणार आहेत. यामध्ये रस्ते उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो अशा ट्रिपल योजनेला मंजुरी मिळाली आहे. तर पुणे आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान नव्या महामार्गाची देखील घोषणा करण्यात आली आहे.

Img 20230511 wa0002282296555721650380460122

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये