शरद पवार यांच्या हस्ते व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ऊपक्रमाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव सातारा येथील जन्मस्थळ स्मारकाची जबाबदारीचे संपुर्ण दायित्व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांनी घेतले आहे. वर्षभर दर महिन्याला विविध सामाजिक उपक्रमांच्या शुभारंभाची सुरुवात पवार यांच्या हस्ते व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करुन झाली.
यावेळी डाकले पवारांना ऊपक्रमाची माहिती दिली. यावेळी पक्ष प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेविका प्रिया गदादे -पाटील, शिवाजी गदादे पाटील , सचिन डाकले इ. उपस्थित होते.नायगांव सातारा येथे छगन भुजबळ ( अन्न व पुरवठा कॅबिनेट मंत्री )आणि वर्षाताई गायकवाड ( शिक्षणमंत्री ) यांचे हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. पर्वतीचे अध्यक्ष नितीन कदम, दिलीप अरुंदेकर व सहकारी यांनी विनंतीला मान देऊन आले.

विजय डाकले म्हणाले, या कामी पुरातत्व विभागाचे राज्य ऊपसंचालक मा. विलास वाहणे यांचे विशेष सहकार्य लाभले. शहरातील नेते व अनेक पदाधिकारी यांनी ऊपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले.पुणे शहर मातंग समाजाचे अनेक नेतेगन आज आवर्जुन आले होते . सामाजिक न्याय विभागाचे आठही मतदारसंघ अध्यक्ष व कार्यकारणी वेळ देऊन झोकुन काम केले त्यांचे मनःपुर्वक आभार.



