पुणे शहर

भुसारी कॉलनीत उभारलं जाणार अत्याधुनिक क्रीडा संकुल ; नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

सुमारे एक एकर जागेवर विविध क्रीडा सुविधांना मंजुरी;

कोथरूड : भुसारी कॉलनी परिसरातील युवा आणि क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. उजवी भुसारी कॉलनी येथील सर्व्हे क्रमांक १०१, महाडकर व वेस्टेंड व्हिलेज सोसायटीलगतच्या सुमारे एक एकर जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यास पुणे महानगरपालिकेची मंजुरी मिळाली आहे.  या प्रकल्पासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे.

या क्रीडा संकुलासाठी १९ मे २०२५ पासून सातत्याने पत्रव्यवहार, प्रशासकीय पाठपुरावा आणि आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अमेनिटी स्पेस कमिटीसमोरील तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रस्तावाची प्रक्रिया दोन वेळा पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान आलेल्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतद पाटील खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तपकीर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, अशी भावना नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया गतिमान झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Addaheading 20260922 174920 00004820041175559346531

त्यानंतर या महिन्यात झालेल्या अमेनिटी स्पेस कमिटीच्या बैठकीत क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाच्या पुढील कामाला गती मिळावी यासाठी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या ‘स’ यादीतील निधीतून मार्च महिन्यातच ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

आता लवकरच प्रकल्पासाठी आर्किटेक्टची नियुक्ती करून क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

भुसारी कॉलनी परिसरात उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल परिसरातील युवा पिढीला खेळासाठी व्यासपीठ आणि क्रीडाप्रेमींना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारे ठरणार आहे. परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज क्रीडा सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

भुसारी कॉलनी मध्ये क्रीडा संकुल उभारले जाणार हे या भागातील क्रीडा प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. या संकुलामध्ये जलतरण तलाव बॅडमेंटन हॉल विचारधीन असून नागरिकांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल असे किरण दगडे पाटील यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये