पुणे शहर

आजपासून बावधन मध्ये विठुनामाचा गजर..कीर्तन महोत्सवात नामवंत कीर्तनकारांचा असणार सहभाग..

पुणे : आज पासून पुढील सात दिवस बावधन बुद्रुक आणि परिसर  विठुनामाच्या भक्तीरसात न्हाऊन निघणार आहे. कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील (मुकादम) यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आठ दिवस चालणाऱ्या या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तनकारांच्या श्रवणीय कीर्तनातून विठुनामाचा गजर व संतांच्या विचारातून सामाजिक प्रबोधन होणार आहे.

बापूसाहेब ज्ञानोबा दगडे पाटील मुकादम यांनी वडील कै. ज्ञानोबा बाबुराव दगडे पाटील यांच्या आठवणीत व प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवार दिनांक १३ सप्टेंबर ते शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ पर्यंत असणारा हा कीर्तन महोत्सव रोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत बावधन बुद्रुक येथील तलाठी ऑफिस समोरील मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे. वडिलांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेला हा महाराष्ट्रातील पहिला कीर्तन सोहळा असणार आहे.

Img 20250508 wa00014407724251968801054

या अखंड हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक (नागपूर), रविवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), मंगळवार १६ सप्टेंबर रोजी युवक भूषण ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर), बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी भागवताचार्य ह.भ.प. सोपान महाराज सानप (हिंगोली), गुरुवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी आवाजाचे जादूगार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा), शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (बीड), यांची कीर्तन सेवा असणारा आहे तर शनिवार दिनांक २० सप्टेंबर रोजी स्वरभास्कर ह.भ.प. अनंत महाराज काळे (संगमनेर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह.भ.प. माऊली महाराज गुंजाळ (गोदावरीधाम)

कीर्तन व हरिपाठ : सांदिपनी गुरुकुल संगमनेर तर साथ सांगत देण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक व वादकांची उपस्थिती राहणार आहे. कीर्तनानंतर रोज महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

Img 20250906 wa0042281292667080974856625006
Fb img 17575688025518630244243602003405

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये