महाराष्ट्र
विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच एका महिलेने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. महिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळी अचानक एक महिला विधानभवनाबाहेर आली. तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करणारी महिला नाशिक येथील असल्याचे सांगण्यात येते. ती नाशिकहून मुंबईला आली होती. तिने नाशिकच्या पोलीस आयुक्तांवर काही गंभीर आरोप केले आहेत.




