महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन स्त्रीशक्तीचा सन्मान; पल्लवी गाडगीळ यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : भारतीय जनता पार्टी कोथरूड मतदार संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी गाडगीळ यांच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा केली अशा महिलांचा स्त्रीशक्तीचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पुरस्कारांमध्ये महिला उद्योग केंद्राचे ज्योती बेंडाळे ज्यांनी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिले, सामाजिक कार्यकर्ते मंजिरी आनंद भावे,राजश्री बाळू दांडेकर, चंपा रोटांगण,डॉ. शितल साळुंखे, शिक्षिका अंजली राजेंद्र गायकवाड, शोभा विलास मोकर, प्रतिभा वईकर, लता मकवान, तनुजा काळे, सुवर्णा पवार,अशा स्त्री सन्मान करण्यात आले व 500 महिलांना सॅनिटायझर नॅपकिन देण्यात आले. व महिलांना आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मिसेस.इंडिया शिल्पा अडम, उद्योजक व समूह देशीका सरिता चीतोडकर, लायन्स क्लब ऑफ पुणे प्लॅटिनम सचिन धोका, शरद पवार, विलास मुळे, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, केतकी कुलकर्णी, सुरेखा जगताप, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर ,सुवर्ण काकडे, अमरजा पटवर्धन,जयश्री टेमकर, शितल गुंड,प्रीती भाटी, कोथरूड मतदार संघ भाजपा झो.आघाडी अध्यक्ष बाळू दांडेकर, व्यापारी संघटना उपाध्यक्ष बाळासाहेब विचारे, SC मोर्चाचे अध्यक्ष सुहास साठे, कैलास मजिरे, सुरेंद्र कंधारे, राजेश मनगिरे, विनोद स्वराज पाटेकर,बाबू मस्के, अजय चोरी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते




