उद्योग

Bank Strike: खासगीकरणाविरोधात बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

नवी दिल्ली : सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघ (AIBEA) च्या केंद्रीय कमिटीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला संपावर जाणार आहेत.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्याच बँका ठेवणार आहे. इतर बँकांचे विलीनीकरण अथवा खासगीकरण करण्याचा सूतोवाच याआधीच करण्यात आला आहे. 

बँकाच्या खासगीकरणाबाबत यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने (UFBU) हा संप पुकारला आहे. यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन (UFBU) हा सरकारी बँकांच्या हे यूनियनचा संयुक्त मंच आहे. त्यांनी 23 आणि 24 फेब्रुवारीला संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआईबीओसी) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. 

हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी हा संप असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. या अगोदर यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियनने दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 आणि 16 मार्च 2021 रोजी संप पुकारला होता. त्यानंतर 16 आणि 17 2021 डिसेंबरला बँकिंग कायदा अधिनियम 2021 च्या विरोधात संप पुकारला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये