महाराष्ट्र

बेलापूर किल्ला लवकरच पुरातत्वच्या देखरेखीखाली

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवी मुंबई येथील पदाधिकाऱ्यांना घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांनी “बेलापूर किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी” या प्रश्नाच्या संदर्भात मंत्री अमितजी देशमुख यांची भेट घेतली.

बेलापूर किल्ला लवकरच पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम करेल असे दिले आश्वासन यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी दिले.

पोर्तुगीजांविरोधात मराठा व आगरी-कोळी समाजानी कडव्या झुंजीनंतर जिंकलेल्या नवी मुंबईतील बेलापुर किल्ल्याच्या निकृष्ट दर्जाच्या व सिमेंटीकरणाच्या विरोधात आज सांस्कृतिक मंत्री अमित विलासराव देशमुख ह्यांची राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे, उपाध्यक्ष नितिन नाना चव्हाण, श्रीकांत माने , अमोल मापारी उपस्थित होते.

सदर प्रसंगी मंत्री महोदयांना तात्काळ बेलापूर किल्ल्याचे काम थांबवण्याची विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली यावर मंत्री अमित देशमुख ह्यांनी पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे ह्यांना त्वरीत बेलापूर किल्याच्या होणाऱ्या कामाची पाहणी करत गरज पडल्यास काम थांबवण्याचे आदेश दिले तसेच सिडको संचालक संजय मुखर्जी ह्यांना बेलापूर किल्याच्या कामाची चौकशी करण्याकरीता सांगण्यात आले ह्यावेळी अमित देशमुख ह्यांनी बेलापूर किल्ला हा पुरातत्व विभागाच्या अटी नियमानुसार आमच्या देखरेखीखालीच काम करेल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी हा विषय माझ्याकडे मांडला होता. त्यावर तातडीने मंत्र्यांची वेळ घेऊन बैठक घेतली. राष्ट्रवादी युवकांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये