महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ; संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ही भेट झाली असली तरी संजय राऊत यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांची पांढऱ्या रंगाची गाडी या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसते.दुपारी दीड ते साडेतीन पर्यंत चर्चा झालीय. या दोघांच्या भेटीच्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात आहे.
सांताक्रूज येथील सप्ततारांकीत हॉटेल ग्रॅड हयात येथे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास बैठक झाली. दुपारी दीड ते साडे तीन तास चर्चा झाली. सध्याच्या राजकीय घडामोडींवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही.
देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही.- चंद्रकांत पाटील
याबाबतीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांची भेट झाल्याची मला कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असते अस नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार अस आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही.



