पुणे शहर

पोस्टमन काकांना औक्षण करुन भाऊबीज साजरी

महर्षीनगर : मागील आठ महिन्यात करोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या परिसरातील पोस्टमन काकांना श्री साई योगी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भाऊबीज भेट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी परिसरातील सर्व पोस्टमन काकांना दिवाळी फराळ साहित्य असलेले किट, सॅनीटायझर व मास्क भेट देण्यात आले.

Img 20201118 wa0057

योगिता सुराणा, अनुसया गायकवाड, हलिमा शेख यांनी पोस्टमन काकांना औक्षण करुन भाऊबीज साजरी केली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत सुराणा म्हणाले कि, ‘कोरोनाच्या प्रादुर्भाव तीव्र असतानाच्या काळात स्वतःच्या जिवाशी पर्वा न करता आलेले पत्र घरोघरी जाऊन देण्याचे काम त्यांनी अगदी चोखपणे बजावले. त्यामुळे नागरिकांची कायदेशीर कामे ही विना अडथळा पार पडली. दिवाळीच्या काळात पोस्टमन काका यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडलेला असतो. त्यांच्याही घरात आरोग्याची काळजी घेत दिवाळी साजरी व्हावी ह्याकरिता श्री साई योगी सेवा प्रतिठानकडून त्यांना आम्ही छोटीशी भेट दिली.’

Img 20201114 wa0195
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

यावेळी पारंपरिक पध्द्तीने पोस्टमन यांचे औक्षण करून त्यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. अभय छाजेड, राजेंद्र बाठिया, मोहन बागमार, रमेश जाधव आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री साई योगी सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष भरत सुराणा , योगिता सुराणा यांनी केले होते. तसेच कार्यक्रमाचे नियोजन दिपक शेलकर, परमेश्वर हुसगे सर, हेमाशू सुराणा यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये