पुणे शहर

बावधनमध्ये बिग बास्केट गोडाऊनला मोठी आग

पुणे : बावधन येथील उत्तमनगर या ठिकाणी पुराणिक सोसायटी जवळ ऑनलाईन मागणीवरून किराणा माल घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीच्या गोडावूनला रात्री ११ वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आग भयंकर मोठ्या प्रमाणात होती. सुमारे अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.(Big Basket godown fire in Bawadhan)

काल राञी (रविवारी) साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग. आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए व एमआयडीसी येथील एकूण 12 फायरगाड्या व जवानांकडून आग नियंत्रणात. जखमी कोणी नाही .

Img 20210913 wa0000

आग विझविण्याचा खूप प्रयत्न चालू होता. शॉप बंद झाल्यामुळे आत कोणी नाही. बाहेर सुरक्षा रक्षक असतात. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीबाबत कोथरूड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख गजानन पाथरुडकर यांनी दिलेली माहिती की, पत्र्याचे शेड दुकानासारखे परिसर मोठा आहे. आतील १५ ते २० रिक्षा बाहेर काढल्या आहेत. आत अनेक गाड्या जळाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये