कर्वेनगरमधील विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळाकडून महिलांना गणरायाच्या आरतीचा मान..

कर्वेनगर : pune city, karvenagar येथील भालेकरनगर मधील विठ्ठल रुक्मिणी मित्र मंडळाच्या गणपतीची आरती परिसरातील महिलांच्या हस्ते करून मंडळाच्या वतीने एक नवा आदर्श घालून देण्यात आला आहे. घरोघरी आज गौरीचे आगमन झाल्याने महिलांना बाप्पाच्या आरतीचा मान देण्यात आला.
सामाजिक कामात आग्रेसर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंडळाने कायमच समाजापुढे वेगवेगळ्या माध्यमातून आदर्श निर्माण करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे. दरवर्षी समाजातील वेगवेगळ्या घटकांना मंडळाच्या वतीने आरतीसाठी बोलावण्यात येत असते.
मंडळाचे अध्यक्ष चेतन भालेकर म्हणाले की,
आज महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. आतापर्यंत श्रींची आरती करण्याचा मान हा केवळ पुरुषांना होता, पण मागील काही काळापासून महिलांनाही आरतीचा मान मिळत आहे व ही एक महत्त्व पूर्ण बाब आहे. त्यामुळे मंडळाच्या वतीने आज गणरायाची आरती स्थानिक व बचत गटातील महिलांच्या हस्ते करण्यात आली.




