फ्लॅटचा ताबा वेळेत न दिल्याने बिल्डरला मोठा दणका ; कर्वेनगर मधील नागरिकाने दिली होती तक्रार

ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश
पुणे: pune city, karvenagar सदनिकेची पुर्ण रक्कम दिल्यानंतरही मुदतीत सदनिकेचा ताबा न दिल्याप्रकरणी मा. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ग्राहकाच्या तक्रारीनंतर बिल्डरला मोठा दणका दिला असून पूर्ण रक्कम व्याजासहित परत करण्याचे आदेश दिले आहेत. Big blow to the builder for not taking possession of the flat in time
ग्राहक तक्रार निवारण आयोगाने फ्लॅटसाठी भरलेली
५९ लाख ४३ हजार ७०० रक्कम ही मे २०१७ पासुन ९ टक्के व्याजाने दोन महिन्यांचे आत परत करण्याचे आदेश पृथ्वी शेल्टर्स बांधकाम कंपनीला दिले आहेत. विहीत कालावधीत रक्कम न दिल्यास १८ टक्के व्याजाने रक्कम देण्याचे आदेश देण्याबरोबरच नुकसान भरपाईच्या स्वरूपात ३ लाख व तक्रार अर्जाच्या खर्चाच्या स्वरूपात ५० हजार देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्वेनगर येथील अॅड्. बाळकृष्ण निढाळकर यांनी बावधन येथील पृथ्वी शेल्टर्सच्या श्री. प्रकाश पांडूरंग चव्हाण यांचे विरूध्द राज्य ग्राहक तकार निवारण आयोग यांच्याकडे तकार दाखल केलेली होती. पृथ्वी शेल्टर्स यांनी बावधन येथे साई व्हेलोसिटी फेज २ नावाची योजना घोषीत केलेली होती.
निढाळकर यांनी सदरील योजनेमध्ये सदनिकाचे बुकिंग करून पृथ्वी शेल्टर्स यांना ठरलेल्या कराराप्रमाणे रक्कम रूपये ५९ लाख ४३ हजार ७०० हे दिलेले होते व सदरील सदनिकेचा ताबा हा डिसेंबर २०१७ पर्यंत देण्याचे आश्वासन देण्यात आले. सर्व रक्कम पृथ्वी शेल्टर्स यांना दिल्यानंतरही सदनिकेचा ताबा वेळेत दिला नाही. यानंतर निढाळकर
यांनी अॅड्. प्रसाद दिवटे यांच्यामार्फत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे धाव घेतली. राज्य ग्राहक आयोगाने तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे तसेच युक्तीवादानंतर आयोगाने निढाळकर यांच्या बाजूने निकाल दिला. पृथ्वी शेल्टर्स यांनी अनुचित व्यापर पध्दतीचा अवलंब केला असुन त्यांनी मानसिक त्रास दिला असुन तक्रारदार हे नुकसानभरपाई मिळण्यास पात्र असल्याचे नमूद केले. यामध्ये अॅड्. प्रसाद दिवटे यांना अॅड्. निलेश भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबतीत बाळकृष्ण निढाळकर यांनी यांनी सांगितले की अनेकवेळा बिल्डरकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ग्राहक बिल्डरच्या ऑफिसला पाठपुरावा करून थकतात पण योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अशा ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार करून न्याय मागणे गरजेचे आहे. मी केलेल्या तक्रारीनंतर आयोगाने दाखल घेत बाजू समजावून घेतली व न्याय दिला.

One Comment