महाराष्ट्र

दिशा सालीयन प्रकरण; नारायण राणे- नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन

मुंबई : दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात मंत्री नारायण राणे तसेच भाजप आमदार नितेश राणे यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने राणे पिता-पुत्रांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिशा सालियन (Disha Salian) हिच्या आईने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने मालवणी पोलीस ठाण्यात राणे पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वीच मालवणी पोलीस ठाण्यात या दोघांची तब्बल 9 तास चौकशी झाली होती. या प्रकरणात अटकेच्या भीतीने नारायण राणे आणि नितेश राणे सुरुवातीपासूनच अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत होते. अखेर सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करत या दोघांनाही दिलासा दिला आहे.

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या राजकारणावरून तिच्या पालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. दिशावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे आरोप खोटे आहेत. मात्र, आता मृत्यूनंतरही तिची बदनामी करत आहेत. तुमच्या या राजकारणामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. या लोकांमुळे आम्हाला जगायची इच्छा उरलेली नाही. आम्हीही आता जीवाचं बरंवाईट करून घेऊ. त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, असे दिशा सालियन हिच्या आईने सांगितले होते.

दिशाच्या मृत्यूनंतर माध्यमांच्या ससेमिरा मागे लागत असल्याने आम्ही घराबाहेर पडत नव्हतो. मात्र, आता पुन्हा या प्रकरणावरून राजकारणाला सुरुवात झाली आहे. या राजकारणामुळे आमच्या मृत मुलीच्या आत्म्याला शांती मिळत नाही. उगाच पुन्हा सगळं प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. कृपया आम्हाला आता जगू द्या, असे दिशाच्या आईने म्हटले. या सगळ्याविरोधात दिशाच्या पालकांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आमची मुलगी गेली, पण तुम्हाला आमचं दु:ख समजत नाही का, असा सवाल दिशाच्या आईने राणेंना केला होता.

दिशा सालियन हिच्यावर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उपस्थित केला होता. दिशा सालियन हिने आत्महत्या करण्याचे कारणच नव्हते. दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला जबरदस्तीने पार्टीला बोलावले. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी संबंधित फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक होते, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. सात महिने उलटून गेल्यानंतरही दिशा सालियन हिचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. दिशा सालियनच्या इमारतीच्या वॉचमनकडे असणाऱ्या रजिस्ट्रारमधील पानं कोणी फाडली, कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला यामध्ये इतका रस होता, असे अनेक सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये