जॉब्स

Job opportunity : विभागीय आयुक्त पुणे येथे विविध पदांची भरती

पुणे : विभागीय आयुक्त पुणे विभागात विशेष सरकारी वकील आणि अतिरिक्त विशेष सरकारी वकील पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांना 28 मार्च 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Pune Division Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विशेष सरकारी वकील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून कायद्याचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे 7 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

अतिरिक्त विशेष सरकारी वकील या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून कायद्याचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे 7 वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

(ताज्या घडामोडी, नोकरी आणि व्यावसायिक संधीच्या माहितीसाठी सिंहासन न्यूजला फॉलो करा.)

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये