पुणे शहर

मुळशी तालुक्यात भाजपचे आंदोलन


पुणे: भाजपच्या वतीने राज्यसरकारच्या विरोधात मुळशी तालुक्यातील प्रती पंढरपूर विठ्ठलवाडी विठ्ठल मंदिरा पुढे (पौड) येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कारण राज्यसरकरनी दारूची दुकानासह इतर व्यवसाय कोरोना काळात खुले केले आहे पण धार्मिक स्थळे खुले केले नाही सर्व स्तरातून नागरीकांची व भाजपाची मागणी आहे लवकरात लवकर धार्मिक स्थळे सुरू करावी अशी मागणी  केली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दार उघडा, उध्दव ठाकरे दार उघडा ,अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

‎या वेळी कार्यक्रमाचे आयोजन मुळशी तालुका भाजपा अध्यक्ष अॅड विनायक ठोंबरे, मुळशी तालुका भाजपा संपर्क प्रमुख बाळासाहेब कुरपे पाटील,भाजपा सांस्कृतिक अघाडीचे सुरेश ठोंबरे,भाजपा सदस्य दत्ताभाऊ कुरपे,माजी सरपंच ह.ब.प.विष्णूपंत नाकते,महिला मंडळ व इतर भाविक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये