कोथरुड

डहाणूकरमध्ये वासुदेवानं गायल मंदिर उघडण्यासाठी गाऱ्हाणं

कोथरुड :  मंदिरे आणि प्रार्थना स्थळे चालू करण्यासाठी डहाणूकर कॉलनीतील राम मंदिरा बाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घंटा नाद आंदोलन करत सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या आंदोलनात वासुदेवाने गाऱ्हाणं गात मंदिर उघडण्याची मागणी केली.

यावेळी कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, युवा मोर्चा पदाधिकारी निलेश सोनवणे, सौमित्र देशमुख, दर्पण फाटक, बाळू दांडेकर, तेजस कुलकर्णी, अभिषेक कागणे, अक्षय बधे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दारू विक्रीला संधी देवाच्या दर्शनाला बंदी असे फलक यावेळी कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. दुष्यंत मोहोळ म्हणाले की,  मंदिरातून भाविकांना सकारात्मक ऊर्जा मिळत असते. आणि आजच्या या संकटाच्या काळात ही ऊर्जा गरजेची असताना सरकारकडून ती हिरावून घेतली जात आहे. नागरिक स्वतःची व इतरांची काळजी घेत आहेत त्यामुळे मंदिर सुरू झाल्याने कोरोना पसरेल ही बाब चुकीची असून सरकारने तातडीने मंदिरे सुरू करावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये