पुणे शहर

कार्यकर्ता जिंकला…अमोल बालवडकर 903 मतांनी विजयी

पुणे : संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बाणेर बालेवाडी मधील बिग फाईट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमोल बालवडकर अखेरच्या फेरी मध्ये 903 मतांनी विजयी झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार लहू बालवडकर यांचा अमोल बालवडकर यांनी पराभव केला आहे. 

अमोल बालवडकर यांना अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्या नंतर अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वर आरोप करत बालवडकर यांनी प्रचारास सुरूवात केली होती. हि निवडणूक नेता विरुद्ध कार्यकर्ता असे म्हणत बालवडकर यांनी भाजप नेतृत्वाला आव्हान दिले होते. अखेर या लढतीत अमोल बालवडकर यांचा विजय झाला.

Img 20251125 wa01782121520512185783132

अखेरच्या फेरी पर्यंत क्षणा क्षणाला उत्सुकता वाढत चाललेल्या या लढतीत कधी भाजपचे लहू बालवडकर पुढे तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर पुढे असे सुरू होते. मात्र अखेरच्या फेरी मध्ये अमोल बालवडकर यांनी 35604 मते घेत लहू बालवडकर यांचा 903 मतांनी पराभव केला. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये