महिलांसाठी नवी बचत योजना, एकदाच गुंतवणूक अन् मिळवा ‘हा’ मोठा फायदा
पुणे : केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात, अशी एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र २०२३ (MSSC) या योजनेची अधिसूचना सरकारने जारी केली आहे. या योजनेत कोणतीही महिला दोन वर्षांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते. यामध्ये ७.५ टक्के व्याज मिळणार आहे. अधिसूचनेनुसार या योजनेत केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. मुलगी अल्पवयीन असेल तर तिचे पालक अर्ज करू शकतात. महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
एमएसएससीमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा सरकारने निश्चित केलेली आहे. यामध्ये एक महिला एका वर्षात जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवू शकते. तसेच या योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे.यामध्ये गुंतवणूक केल्यावर गुंतवणुकीवर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जाईल. त्याची खास गोष्ट म्हणजे याला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो.
पेमेंट कसे मिळवू शकता
MSSC ही एक सुरक्षित बचत योजना आहे. यामध्ये गुंतवणुकीचा परिपक्वता (maturity) कालावधी दोन वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे. तो पूर्ण झाल्यानंतर तुम्ही फॉर्म-2 (जेथे बँक किंवा पोस्ट ऑफिस) तुम्ही MSSC खाते उघडले आहे.) सबमिट करून पेमेंट मिळवू शकता.
अंशतः पैसे काढू शकता
एमएसएससी खातेधारक कमाल ४० टक्के अंशतः पैसे काढू शकतात, परंतु तुम्ही खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतरच या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
खाते कुठे उघडू शकता
तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन MSSC खाते उघडू शकता.
अंतिम तारीख
MSSC खाते उघडण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली आहे.