महाराष्ट्र

महाविकास आघाडीची 30 तारखेला पुण्यात जाहीर सभा

पुणे : महाविकास आघाडीकडून 30 एप्रिलला पुण्यातील अलका टॉकिज चौकात  (Alka Talkies Chowk) जाहीर सभा होणार आहे. या सभेला तीनही पक्षांमधील नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. तीन पक्षांची एकत्र सभा होणार असल्याने पेट्रोल आणि डिझेलवरील कर, जीएसटीची थकबाकी, महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक यासह मनसे आणि भाजपकडून होणारे प्रयत्न यावर महाविकास आघाडीकडून टीका केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज ठाकरेंची 1 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे सभा होणार असल्याने यावरही महाविकास आघाडीकडून टिप्पणी होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या संकल्प यात्रेत राज ठाकरे यांचा ‘खाज’ ठाकरे असा उल्लेख केला होता. मिटकरींनी त्या भाषणात राज ठाकरेंवर सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे एकट्या मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका मनसेच्या प्रचंड जिव्हारी लागली होती. त्यामुळे तीन पक्षांची एकत्र सभा झाली तर मनसे आणि भाजपवर काय-काय टीका-टीप्पणी आणि आरोप होतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला अद्यापही पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही मनसेकडून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे सभेआधी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. तिथे राज ठाकरे यांच्या सभेबाबत नियोजन होणार आहे. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचंही नियोजन केलं जाणार आहे. राज ठाकरे जेव्हा पुण्याहून औरंगाबादला जाणार तेव्हा 150 ते 200 गाड्यांचा ताफा असणार आहे.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये