पुणे शहर

कर्वेनगर वारजे प्रभागातील ४०० महिलांनी मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरीचे प्रशिक्षण पूर्ण करत केली स्वयंपुर्णतेकडे वाटचाल..

खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले प्रशस्तीपत्र आणि आरी वर्क किट

कर्वेनगर : महिला दिनाच्या निमित्ताने वारजे कर्वेनगर प्रभागातील महिलांसाठी ओंकार चॅरिटेबल ट्रस्ट आणि अंतरंगी डिजायनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरी अर्थात आरी वर्क या एक महिन्याच्या प्रशिक्षण शिबीरात ४०० महिलांनी प्रशिक्षण पूर्ण करत स्वयंपुर्णतेकडे वाटचाल केली. या महिलांना आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

महिला दिनाच्या निमित्ताने यशस्वी महिलांचे सत्कार सोहळे झालेच पाहिजेत पण समाजातील महिला कला कौशल्य शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, त्यांनी स्वयंपुर्णतेकडे वाटचाल केली पाहिजे या हेतूनेही उपक्रम राबवले गेले पाहिजेत. त्याच हेतुन ओंकार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्या माध्यमातून हा मोफत हॅन्ड एम्ब्रॉयडरीचा एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता.

Screenshot 20250327 192122 samsungnotes6439383861966424262

गेल्या एक महिन्यापासून सुरू या शिबिरात तब्बल ४०० महिलांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत उपक्रम यशस्वी केला. अत्यंत एकाग्रता आणि चिकाटी ठेवून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या महिलांना पाठबळ मिळावे यासाठी आरी वर्क किट वाटप आणि प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आरी वर्क किट आणि प्रशस्तीपत्र देऊन या महिलांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी चंचला भोसले आणि प्रियंका भोसले यांचे विशेष सत्कार करत प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

Img 20250418 wa0170685061056679775924
Img 20250418 wa01687902084758268754405

या प्रसंगी सुप्रिया सुळे यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणारा उपक्रम राबवल्याबद्दल माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने,  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले. भविष्यातही असे अधिकाधिक उपक्रम आयोजित करावे, अशा शुभेच्छा दिल्या. 

स्वप्नील दुधाने म्हणाले, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला अत्यंत समाधान देणारा होता. यावेळी एकही धागा चुकल्यास पुन्हा नव्याने हे काम करावे लागते, अशी हस्तकला या भगिनींनी आत्मसात केली असून आपली प्राचीन भारतीय संस्कृती जपत प्रचंड रोजगार निर्मिती होईल, अशी आशा वाटते.

Img 20250418 wa01673180233812736697658

यावेळी कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी, महिला अध्यक्षा प्रियांका तांबे, कोथरूडचे माजी युवक अध्यक्ष  प्रमोद शिंदे, पुणे शहराच्या महिला सरचिटणीस संगीता लिंबोळे, पल्लवी  शेडगे, सुनीता पवार, मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्वेनगर वारजे प्रभागाचे अध्यक्ष किशोर शेडगे यांनी केले.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये