पुणे शहर

पुण्यात संभाजी भिडेंसह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे पोलिसांनी परवानगी नाकारली असताना सभेचे आयोजन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह १५० जणांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Img 20230717 wa0012281291948762095496285435

याप्रकरणी संभाजी भिडे, राजेंद्र आव्हाळे, राहुल उंद्रे, बाळासाहेब नेवाळे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस कर्मचारी रितेश नाळे यांनी या संदर्भात लाेणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे  शनिवारी (२ सप्टेंबर) संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

Img 20221228 wa0001282294128958397815578022

भिडे यांनी वादग्रस्त विधाने करुन समाजात तेढ निर्माण करत असल्याने त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी विविध संघटना, राजकीय पक्षांकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. भिडे यांची सभा झाल्यास उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत लोणीकंद पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवला होता. परवानगी नाकारल्यानंतर भिडे यांची सभा झाल्याने पोलिसांनी रविवारी मध्यरात्री संयोजकांसह भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये