पुणे शहर

शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ किशोरी पेडणेकर उद्या कोथरूडमध्ये

पुणे : शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणून चर्चेत असलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उद्या शनिवारी शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी कोथरूड मध्ये येणार आहेत. त्यामुळे कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील कार्यक्रमामध्ये त्या कोणत्या विरोधकांवर तोफ डागणार  या विषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. या संघर्षात शिवसेनेकडून शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सोबतच शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या आघाडीवर आहेत. या पार्श्वभुमीवर पेडणेकर पुण्यात येत आहेत. त्यामूळे पुण्यात त्या विरोधकांवर काय बोलणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना आणि श्री शिवसाई संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवार दिनांक ३०/०४/२०२२ रोजी फक्त महिलांसाठी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून किशोरी पेडणेकर उपस्थित राहणार आहेत. यासोबतच शिवसेनेने उपनेते शशिकांत सुतार, संपर्क प्रमुख सचिन अहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे आणि शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.  अशी माहिती माजी वृक्ष प्राधिकरण समिति सदस्य जयदीप पडवळ यांनी दिली आहे.

पडवळ म्हणाले, दिनांक ०१/०५/२०२२ रविवारी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० आरोग्य शिबीर आणि सायं.०५.०० ते ०८.०० वाजेपर्यंत चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना शाखा पौड रोड,आयडियल कॉलनी, कोथरूड. याठिकाणी हे आयोजन करण्यात आले आहे.

Img 20220428 wa0008 1
Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये