
पुणे : महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघातील विजयी उमेदवार आमदार अरुण गणपती लाड व पुणे शिक्षक मतदारसंघांतील आमदार प्रा.जयंत दिनकर आसगावकर यांच्या विजया निमित्त श्री दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.
या प्रसंगी महाविकास आघाडी तर्फे माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी अंकुश काकडे, शिवसेना सहसंपर्कप्रमुख प्रशांत बधे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेवक विशाल धनावडे, माजी नगरसेवक दत्ता सागरे उपस्थित होते.
दीपक मानकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे आणि तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर जनतेच्या असलेल्या विश्वासामुळे पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.आरतीचे आयोजन दत्ता सागरे यांनी केले.







