पुणे शहर

कार्यकर्त्यांच्या मनातील चंद्रकांतदादा पाटील..

पुणे : pune city उत्तम संघटन कौशल्य, समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती आणि समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी तळमळ असणारा नेता चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोथरुड मतदार संघाला आमदार म्हणून मिळाला. आणि कोथरूडच्या राजकीय, सामाजिक जीवनाला वेगळे वळण मिळाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कायकर्ता ते आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. Chandrakant Dada Patil in the minds of activists

एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मनात जनसेवेची प्रखर इच्छा ठेऊन नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजेत याला सर्वप्रथम प्राधान्य दिले. सत्तेत असताना मंत्री म्हणून काम करताना त्यांनी जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय असू द्या किंवा आता विरोधी बाकावर बसून जनतेच्या हितासाठी सरकारला धारेवर धरणे असू द्या चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भूमिका प्रत्येक वेळेस सरस ठरली. सध्याच्या सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात कोथरुड मतदार संघातील नागरिकांसाठी त्यांनी केलेले काम वाखानण्याजोगे आहे.

राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन निर्माण केले. अडचणीच्या काळात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कोथरुड मधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण दगडेपाटील ( नगरसेवक)
चंद्रकांत दादा पाटील कोथरुडचे आमदार झाले आणि एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले नेतृत्व कोथरुडला मिळाले.    त्यांच्या मितभाषी स्वभाव गुणांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आपलंसं करून टाकलं आहे. जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहतात. कोरोनाच्या काळात दादांनी केलेल्या कामामुळे कोथरुड मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वस्ती विभागातील नागरिकांना अन्नधान्य किट वाटप, सोसायटी विभागात सुरक्षा किट वाटप, कोविड केअर सेंटर सुरू करणे, ऑक्सीजन बेड तयार करणे, होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना डॉक्टरांकडून मोफत सल्ला, घरपोच औषधे व जेवण अशी अनेक कामे त्यांनी केल्याने नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्या दादांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

दिलीप वेडेपाटील ( नगरसेवक)
जनसेवेचे व्रत घेतलेले नेतृत्व म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. कठीण काळात कस काम करायचं हे दादांनी कोरोनाच्या या परिस्थितीत कार्यकर्त्यांना दाखवून दिले. केवळ राजकारण न करता जनतेच्या कामाला प्राधान्य देण्याची शिकवण ते कार्यकर्त्यांना देत असतात. कोरोनाच्या या संकट काळात समाजातील प्रत्येक घटकाला त्यांनी मदत केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना कोथरुड मधील प्रत्येक प्रश्नावर त्यांचे बारीक लक्ष असते. म्हणूनच महापालिकेत वारंवार बैठका घेऊन शहराचे व कोथरुड मतदार संघाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहून ते त्यांना कायम प्रोत्साहन देत असतात. जनतेच्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य देणाऱ्या दादांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

Img 20210522 wa0203

जयंत भावे (नगरसेवक)
सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असणारे नेतृत्व म्हणजे चंद्रकांतदादा पाटील. सामान्य कुटुंबातून आल्यामुळे चंद्रकांत दादांना सर्वसामान्या नागरिकांचे दु:खं, त्यांच्या व्यथा अतिशय जवळून माहिती आहेत. सर्वसामान्यांचे  प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम प्रयत्न करत असतात. परंतु जे प्रश्न शासकीय स्तरावर सोडवणे शक्य नाही असे प्रश्न सोडून न देता ते प्रश्न विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कसे सोडवता येतील यावर त्यांचा भर असतो . कोरोना संकट काळात कोथरुड मतदार संघात त्यांच्याकडून करण्यात येत असलेले काम इतर राजकीय लोकांसाठी मार्गदर्शक आहे. समाजातील एक ही असा घटक राहिला नाही की दादांकडून त्यांना या काळात मदत झाली नाही. जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

दीपक पोटे (नगरसेवक)
अभाविप चे कार्यकर्ते ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असा मोठा पल्ला गाठणारे चंद्रकांतदादा महसूल मंत्री म्हणूनही ठळक काम करू शकले. ते त्यांच्या अंगी असलेला कार्यकर्ता त्यांनी कायम जिवंत ठेवल्यामुळेच. कोथरूड चे आमदार म्हणून काम करताना मतदार संघात चंद्रकांत दादांनी समाजातील उपेक्षित घटकांना कोरोनाच्या महामारी मध्ये मदत झाली पाहिजे हि भूमिका घेत गेली दीड वर्षे सातत्याने मदत कार्य सुरू ठेवले आहे. अन्नधान्याचे किट , गरजू रुग्णांना औषध वाटप असेल, ऑक्सीजन बेड्स चे सुसज्ज रुग्णालय अशा विविध प्रकारची मदत चंद्रकांतदादा करीत आहेत. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संदीप खर्डेकर ( भाजपा प्रवक्ता)
कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे कोरोना काळातील अफाट सेवा कार्याचे मूल्यमापन कधीच करता येणार नाही. कर्वे संस्था अथवा एस एन डी टी कॉलेज येथे सुरु झालेल्या विलगीकरण केंद्रातील रुग्ण व सेवकांना चंद्रकांतदादांच्या वतीने शत प्लस सह आरोग्य सुरक्षा किट भेट देणे असो किंवा रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणे. कोथरूड चे आमदार म्हणून दादा करत असलेले कार्य ह्याला प्रचंड असेच म्हणावे लागेल. गत वर्षभरात असे एकही क्षेत्र नाही जेथे दादांनी मदतकार्य केले नाही किंवा त्याकार्यामागची प्रेरणा ते ठरले नाहीत. सोसायट्यामध्ये  सॅनिटायझशन असेल किंवा हँडसफ्री सॅनिटायझर स्टँड भेट देणे असेल, गरजू ज्येष्ठ नागरिकांना घरपोच डबे पोहोचविण्याचा उपक्रम असेल किंवा मोफत Quarantine centre ची उभारणी असेल,अर्सेनिक अलबम चे मोफत वाटप असेल किंवा शिधा वाटप, चंद्रकांतदादांनी कधीच हात आखडता घेतला नाही. जनतेसाठी प्रश्नांसाठी अविरत काम करणाऱ्या दादांना जन्मदिनाच्या शुभेच्छा !

सचिन दांगट ( अध्यक्ष भाजप सहकार आघाडी पुणे शहर)
सामान्य जनतेत मिसळणारे आणि त्यांचे प्रश्न सोडवणारे अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत दादा पाटील. स्वभावात असलेल्या नम्रतेने त्यांच्याशी अनेक लोक, कार्यकर्ते जोडले गेले आहेत. कार्यकर्त्यांना दूरदृष्टी देणारे, योग्य मार्गदर्शन करणारे नेतृत्व म्हणून आम्ही दादांकडे पहातो. समाजकारणात व राजकारणात काम करताना त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर प्राधान्याने भर दिला. कोरोनाच्या महाभयंकर काळात त्यांनी जनसामान्यांसाठी केलेले काम न विसरता येण्यासारखे आहे. कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात ते कायम सहभागी होत असल्याने कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटतात. कार्यकर्त्यांना आपलेसे करणाऱ्या दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

विनोद मोहिते (सरचिटणीस भाजप ओबीसी आघाडी पुणे शहर)
चंद्रकांतदादा यांच्या सारखे नेतृत्व कोथरुड मतदारसंघाला लाभल्याने कोरोनाच्या कठीण काळामध्ये कोथरुडमधील नागरिकांना मोठी मदत मिळाली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख दुःखात सहभागी होणारे दादा मोठे नेते असून ही अजून ही कार्यकर्त्या प्रमाणेच समाजात वावरताना दिसतात. आंदोलनामध्ये तरुण कार्यकत्यांना लाजवेल असा उत्साह दादांमध्ये संचारतो. मतदासंघातील प्रत्येक प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तो कसा सोडविता येईल याबाबतीत दादा आम्हा कार्यकर्त्यांना कायम मार्गदर्शन करीत आहेत. दादा आपणांस जन्मदिनाच्या शुभेच्छा !

कुलदीप सावळेकर (अध्यक्ष – भाजप बूथ समिती पुणे शहर)
चंद्रकांतदादा यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली. कार्यकर्त्यांचे उत्तम संघटन निर्माण केले. अडचणीच्या काळात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मुळातच कार्यकर्ता असलेल्या दादांकडे संघटन बांधणीचे मोठे कौशल्य आहे. संघटनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या मांडीला मांडी लावून सतरंजीवर बसूनच बैठकीत मार्गदर्शन करण्याची दादांची शैली कार्यकर्त्यांना जवळची वाटते. समाजासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या चंद्रकांत दादांना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

अमोल साबळे, विनायक बेदरकर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये