पुणे शहर

सुरू असलेली पदयात्रा चंद्रकांत मोकाटे यांनी अचानकच थांबवली अन् त्यानंतर जे घडले.. अधिकाऱ्यांची झाली धावाधाव

पुणे : कोथरूड येथील सागर कॉलनीत आज मंगळवारी सकाळी पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधत असतानाच ओढ्या लागत साचलेला कचरा व त्याभोवती फिरत असलेली डुक्करे पाहून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने पदयात्रा थांबवली आणि कार्यकर्त्यांना सांगून पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी, मुकादम व कर्मचाऱ्यांना तातडीने जागेवर बोलावून घेतले आणि साचलेला कचरा दाखवून हे स्वच्छ कधी होणार कचरा असाच पडून राहणार का असा सवाल केला आरोग्य विभागाच्या अधिकारी व मुकादमानी तातडीने स्वच्छ करतो असे सांगितलं व कामास सुरुवातही केली.

हा प्रसंग आज मंगळवारी सकाळी 11 ते 11-30 च्या दरम्यान घडला.मोकाटे आज सकाळी शास्त्री नगर भागात पदयात्रेद्वारे नागरिकांशी संपर्क साधून मतदान करण्याचे आवाहन करत होते. त्यावेळी ते सागर कॉलनीत फिरत होते अचानक ते कॉलनीतील वाहणाऱ्या ओढ्याजवळ आले तेव्हा त्यांना या परिसरात प्रचंड अस्वच्छता दिसली ते पाहून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली त्यांनी या परिसरात राहणाऱ्या महिलां व कार्यकर्त्यांकडे चौकशी केली तेव्हा त्यांना मिळालेल्या माहितीने धक्काच बसला.

Img 20241020 wa0001435697684176070576

या परिसरात साचणाऱ्या कचऱ्याविषयी तक्रारी केल्या तर फारशी दखल घेतली जात नाही कचऱ्याच्या गाडीमागे कचरा टाकण्यासाठी महिलांना पळत जावे लागते स्वछतागृहाची वाईट दुरावस्था आहे स्वछतागृहात घाण साचलेली असते ती साफ करण्यास कर्मचारी वेळीअवेळी येतात त्यांनाही आम्हाला सांगावे लागते या अस्वछते मुळे रोगराई पसरण्याचा धोका होतो त्यामुळे येथील रहिवाशी आजारी पडतात.अशी गाऱ्हाणी या परिसरातील महिलां रहिवाशी वैशाली कोळेकर, धनश्री बागडे, जनाबाई ठोंबरे,  शांताबाई बढेकर आदी महिलांनी मोकाटे यांच्याशी संवाद साधताना सांगितली .ही गाऱ्हाणी ऐकून चंद्रकांत मोकाटे प्रचंड अस्वस्थ झाले. ही सर्व गाऱ्हाणं पुणे महापालिकेच्या अधिकारी व मुकादमांसमोर महिलांनी मोकाटे यांना सांगितली

ही गाऱ्हाणी ऐकून अधिकारी व मुकदम कुलकर्णी यांनी मोकाटे यांच्यासमोरच तातडीने स्वछता करतो असे सांगितलं तसेच ओढ्याची साफसफाई 4 दिवसात करतो असे सांगितलं
मोकाटे यांनी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे त्यांचे आरोग्य चांगले राहिले तरच त्यांचे जीवनमान सुधारणार आहे नागरिकांनी व रहिवाशांनी सुद्धा स्वछतेविषयी जागरूक राहिले पाहिजे जनजागृती केली पाहिजे असे नागरिक व रहिवाशांसी बोलताना सांगितलं आणि पुढील पदयात्रेला सुरुवात केली.

Img 20240404 wa0016281297658999536660438617
Img 20240404 wa0013281298602993728148316202

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये