महाराष्ट्र

पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे स्मारकासाठी जागा ताब्यात : स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल..

महाराष्ट्रातील लहु प्रेमींसाठी एतिहासिक दिवस.

पुणे : पुणे शहरात होणाऱ्या आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या भव्यदिव्य नियोजित स्मारकाच्या  कामातील महत्वाचा टप्पा आता पार पडला आहे. या स्मरकासाठी भुसंपादन निवाडा प्रशासनाने जाहिर केला होता. त्याची मुदत संपताच आज प्रशासन आणि स्मारक शासकीय समिती यांनी संयुक्तरित्या कायदेशीर सोपास्कार पार पाडत स्मारकासाठी जागा ताब्यात घेतली.

शासकीय समितीचे अध्यक्ष विजय डाकले, सदस्य बाळासाहेब भांडे, रवी पाटोळे, रामभाऊ कसवे, तसेच पालिकेच्या भवन रचना, मालमत्ता विभाग, भुसंपादन विभाग, नगर भुमापन अधिकारी -२, विशेष भुसंपादन अधिकारी -१५ या विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्मारकासाठीची आरक्षित असलेली साडे पाच एकर जागा ताब्यात घेण्यासाठी हजर होते.

जागेची मोजणी व हद्द कायम केल्यानंतर पंचनामे करण्यात आले. पंच म्हणुन हजर असलेले भाऊसाहेब सोनावणे व रावसाहेब खंडागळे यांनी आणि जागेचे सर्व मालक हजर होते या सर्वांच्या सह्या झाल्या. सर्व सोपास्कार पार पाडुन जागेचा अधिकृतरीत्या ताबा घेण्यात आला. यावेळी स्मारकाच्या जागेमध्ये काही अनाधिकृत शेड होती अध्यक्ष विजयबापु आणि समिती सदस्यांनी शेड मालकांना सदर शेड काढण्याबाबत विनंती केल्याने तात्काळ ही शेड काढुन घेण्यात आली.

हा क्षण लहुप्रेमी आणि पुणेकरांसाठी तसेच मातंग समाजाच्या लढ्यात महत्वपुर्ण असुन स्मारकाच्या कामातला महत्वाचा टप्पा आहे. समितीचे अध्यक्ष विजयबापु आणि ऊपस्थित समिती सदस्यांनी यावेळी जागेच्या मालकांचे सहकार्य केल्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानले. विजय डाकले यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडी, आणि राज्यातील व शहरातील लहुप्रेमी व समाजबांधवांचे अभिनंदन करुन आभार मानले.

Img 20220518 wa0013505028502486174026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये