पुणे शहर

राज ठाकरेंची सभा 22 मे रोजी या ठिकाणी?

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी (२२ मे) गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राज ठाकरे पुण्यामध्ये आले होते. मंगळवारी रात्री अक्षरधारा बुक गॅलरी येथून त्यांनी पुस्तकांची खरेदी केली होती. मात्र, अचानक ठाकरे यांना पुण्याचा दौरा अर्धवट ठेवून मुंबईला परतावे लागले होते. त्यानंतर ही सभा होईल की नाही या विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र,आता ही सभा रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार असल्याचे समजत आहे.

Img 20220519 wa0035
Img 20220518 wa0013505028502486174026

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये