पुणे शहर

पदवीधर नोंदणीसाठी बनवलेल्या विशेष वाहनाचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

कोथरुड : भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणीसाठी बनवण्यात आलेल्या विशेष वाहनाचे उदघाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पुणे भाजपा उपाध्यक्ष गणेश काळमकर, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे, गिरीश भेलके, सचिन पाषाणकर, कोथरुड ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश चव्हाण, वर्षा डहाळे, हर्षदा फरांदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Img 20201028 wa0145

या नोंदणी वाहनामार्फत शहरातील विविध भागात जाऊन मतदार नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून घेतली जाणार असल्याचे भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे, शहर सरचिटणीस विनोद मोहिते यांनी सांगितले. यावेळी नागरीकांचे पदवीधर नोंदणीचे भरलेले अर्ज पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

Img 20201024 wa0166 1

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये