महापौरांनाही महावितरण दाद देत नसेल तर छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने आंदोलन पुकारु – प्रदीप गोपाळघरे

वारजे एसआरए योजनेतील पिण्याच्या पाण्याचा वीज मीटर पुन्हा पूर्ववत करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा छावा क्रांतीवीर सेनेचा इशारा
पुणे : महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही हे महावितरणचे अधिकारी दाद देत नसतील. तर आम्ही छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य या वतीने आंदोलन पुकारु ह्याची या मस्तावलेल्या MECB अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे.आणि वारजे एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील कापलेला मीटर त्वरित लावावा. अन्यथा आंदोलन निश्चितच केले जाईल याची या सुनील गवळी व बारटक्के दोन्ही अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.असा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी
प्रदीप गोपाळघरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष युवक आघाडी सुदाम शेळके, अर्जून दौडमनी उपस्थित होते. प्रदीप गोपाळघरे म्हणाले, वारजे येथील S.R.A च्या झोपडपट्टी पुनर्वसन बिल्डिंग विषय बोलतो.या वारजे येथील SRA च्या बिल्डींग मध्यील गरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे.ह्या करता आम्ही आवाज उठवत आहोत. आपल्या सरकारने हातावर पोट भरणाऱ्या गरीबांना जमीनी वरुन उचलून बिल्डींग मध्ये नेऊन कोमले. कोणत्याही तिथे सुविधा नाहीत.७ मजल्याच्या इमारत मध्ये नेऊन बसवले. आज तिथे जिन्यात लाईट नाही.की लिफ्ट फक्त नावाला बसवली आहे चालू नाही. त्यात MECB ने पिण्याच्या पाण्याचा मिटरची लाईन गेले १८जुन पासून मिटर सहीत काढली आहे. गेले कित्येक दिवस झाले वयोवृद्ध महीला, गरोधर स्रीया काही आजारी महीला पाणी डोक्यावर घेऊन जात आहेत. उद्या काही अपघात होऊ शकतो. सात मजल्यावर पाणी न्यायचे म्हणजे मृत्यूला आमंत्रण दिल्या सारखे आहे.हि केविलवाणी थरारक स्थिती पाहून मी चक्रावलो.

वारजे येथील नगरसेवक काय करत आहेत. ते का लक्ष घालत नाही.कारण हे MECB चे अधिकारी सुनील गवळी व त्यांचे वरिष्ठ अधिकारी बारटक्के हे कोणत्या ही नगर सेवक असो आमदार किंवा खासदार कोणालाही जुमानत नाहीत.आजच्या मतीला ९४५००/-इतके बिल लॉकडाऊन च्या काळात भरले आहे.शिल्लक ६३०००/- राहीले आहे.तरी आम्ही त्यांना १५०००/- भरतो असे म्हटले. तर आम्हाला सांगतात MECB वर ३ कोटीचे कर्ज आहे.जर मोठ्या कंपन्याचे पैसै तुमच्या कडून वसूल होत नाही.तुम्हाला गोर गरीबांना फक्त त्रास देता येतो.आम्ही आज ह्या MECB च्या अरेरावीला समोरे जाऊन आंदोलन करुन उत्तर देऊ.सर्व गरीबांनी उग्ररूप धारन केले आहे. असेही गोपाळघरे म्हणाले.
या MECBअधिकाऱ्यांच्या स्रीयांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन एकच मजला चढून पहा तर मग अधिकारी लोकांची झोप उडेल. दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलचा बेडवर पडतील.वारजे SRAच्या बिल्डींग मध्ये घरेलूकाम करणार,कचरा गोळा करणार, भंगार गोळा करणारे व इतर काम करणारे गरीब लोकं राहात आहे.मी या प्रेस कॉन्फरन्स व्दारे एकच कळवायचे आहे.महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही हे MECB अधिकारी दाद देत नसतील
तर आम्ही छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य या वतीने आंदोलन पुकारु ह्याची या मस्तावलेल्या MECB अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे आणि आजच मिटर लाऊन टाकावा अन्यथा अंदोलन हे निश्चितच केले जाईल यांची या सुनील गवळी व बारटक्के दोन्ही अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.असा इशारा प्रदीप गोपाळघरे यांनी दिला आहे.



