कोथरुडमध्ये संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाने साकारलेला रक्तबीज राक्षसाचा वध देखावा पाहण्यासाठी गर्दी..

कोथरूड : कोथरूड मधील संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाने साकारलेला रक्तबीज राक्षसाचा वध हा हलता पौराणीक देखावा पाण्यासाठी गर्दी होत आहे. विशेष करून हा देखावा लहान मुलांना आकर्षित करत असून पालक आपल्या मुलांना घेऊन हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत.
संयुक्त भेलके नगर मित्र मंडळाने पौराणीक हलत्या देखाव्याची परंपरा कायम राखली आहे. मंडळाने केलेल्या देखाव्यात दरवर्षी असणारी भव्य हलती मूर्ती गणेशोत्सवाच्या काळात कायमच चर्चेत राहते. त्यामुळे पालक या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी दरवर्षी आपल्या मुलांना घेऊन येत असतात.

मंडळ कायमच मोठ्या प्रमाणावर सामाजिक उपक्रम राबवत असते. कोरोना सारख्या महामारीच्या काळात मंडळाने केलेल्या कामाची सर्व स्तरातून कौतुक झाले. या संकट काळात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, घरी एकट्या असणाऱ्या ज्येष्ठांना जेवणाचे डबे पुरवणे तसेच रस्त्यावर राहणाऱ्यांना अन्न वाटप असे मंडळाने घतले. या बरोबरच रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतो. धनेश हगवणे मंडळाचे अध्यक्ष असून उमेश भेलके हे उत्सव प्रमुख आहेत.












