आमदार सिद्धार्थ शिरोळे व मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी निर्माल्य संकलन करणाऱ्या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन

पुणे : व्हिजन सोशल फाउंडेशन पुणे व चतु:शृंगी सुपर किंग्सच्या वतीने गणेशोत्सव काळात तयार होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मितीसाठी निर्माल्य संकलन करणाऱ्या निर्माल्य वाहनाचे उद्घाटन शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
गणेशोत्सव काळात गणेश पूजनासाठी मोठ्या प्रमाणावर फुले, फळे, नारळ यांचा वापर होऊन मोठ्या प्रमाणावर निर्माल्य तयार होते. सदर निर्माल्य संकलन करण्यासाठी हे निर्माल्य वाहन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
निर्माल्य रथ उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी सर्वश्री पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर , शिवाजी नगर अध्यक्ष गणेश बगाडे ,नामदेव माळवदे,उमेश चौधरी विजयसिंह निकम,विकास डाबी , संतोष काळे, केशव धर्मावत, अपर्णाताई कुऱ्हाडे ,नेरेंद्र तांबोळी, चंदन डाबी ,समद भाई शेख, किरण ओरसे ,हेमंत डाबी,सुजित गोटेकर,लक्ष्मण नलावडे ,विशाल जाधव,स्वप्नील राऊत,पंकज उणेचा ,मोहन जाधव ,प्रवीण डोंगरे ,चतु:शृंगी सुपर किंगचे सर्व सभासद व स्थानिक नागरिक उपस्थित होते. यंदाच्या वर्षी या उपक्रमाचे १८ वे वर्ष आहे.
या उपक्रमाचे संयोजन विकास डाबी केले होते.



















