राष्ट्रीय

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न, प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान 

अयोध्या : पवित्र मंत्रोच्चाराचा ध्वनी… शंखनाद आणि जय श्रीरामच्या घोषात आज प्रभू श्रीरामाचं अयोध्या नगरीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं.

यावेळी जय श्रीरामच्या घोषणाही सुरू होत्या. आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ऊर अभिमानने भरून आला. अन् मनामनातून जय श्रीरामचा जयघोष निनादला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बरोबर दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी राम मंदिरात दाखल झाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरात अनुष्ठान पार पडले. स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. हा मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक झाले होते.

Img 20240121 wa00382598004317740425806
Screenshot 2024 01 23 07 45 22 397201286937204183359
Img 20240121 wa00112357920439439015160
Img 20240121 wa00172482721898892502285
Img 20240121 wa00095487398556080398780
Img 20240121 wa00065252206207234881050
Img 20240120 wa00572661306229998441106
Fb img 17058117418324121437191700473490
Img 20240120 1411245335154334332732265
Img 20240120 wa00096813043095854158068
Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20240122 wa00087153526944112457621
Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये