महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : आजच्या सुप्रीम कोर्टातील कामकाजाचं live प्रक्षेपण होणार

नवी दिल्ली : शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्हा गोठवलं जाणार की नाही? धनुष्यबाण चिन्हावरील शिंदे गटाच्या दाव्याचं काय होणार? सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज फैसला होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE असणार आहे.

आज सकाळी 10:30 वाजल्या पासून live प्रक्षेपण पाहता येणार आहे. कोर्टात आज EWS आरक्षण, महाराष्ट्रातील शिवसेना वाद, दिल्ली-केंद्र सरकार वाद यासारखे खटले पटलावर सुनावणीसाठी घेतले जातील. webcast.gov,in/scindia/ लिंकवर जाऊन ही सुनावणी पाहता येईल, ऐकता येईल.

Img 20220924 182515 453

खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी आज नेमका काय युक्तिवाद केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनुष्यबाण हे आपलंच चिन्ह असल्याचा शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे.

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाकण्याची शिंदे गटाची मागणी आहे. तर आधी आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याची शिवसेनेनं मागणी केलीय. सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये, असा शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला होता. दरम्यान, या सगळ्या युक्तिवादानंतर आज (27 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात पुन्हा युक्तिवाद केला जाईल. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं सुप्रीम कोर्टानं मागील सुनावणीत म्हटलं होतं.

Img 20220910 wa0003

राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या 40 आमदारही त्यांच्या बंडात सामील झाले होते. यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने पुन्हा सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेनेचं हे सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये