पुणे शहर

कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

पुणे : वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगार चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचा कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. जेष्ठ स्त्री अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. श्रुती तांबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१.आत्महत्या ग्रस्त महिला चळवळीत काम करणाऱ्या श्रीमती निलिमा रेंघे यांना रोख पंधरा हजार, सन्मानपत्र व मानचिन्ह, २. विटभट्टी कामगांराना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या मुलांसाठी कामाच्या जागेवर शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून लढून बालवाड्या, अंगणवाड्या सुरु करणारे व झोपडपट्टीतील मुलांसाठी २०१५ पासून विशेषतः स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासासाठी राष्ट्रसेवा दल मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सुरू करणारे युवा कार्यकर्ते विशाल लडकू जाधव यांना पंचवीस हजार रुपये, सन्मानपत्र व मानचिन्ह ३.ऊस तोडणी कामगार म्हणून प्रत्यक्षात काम करणाऱ्या व ऊसतोड मजूर कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी “महिला किसान अधिकार मंच” या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्या श्रीमती दिपा प्रविण वाघमारे यांना पंधरा हजार रुपये, सन्मानपत्र, मानचिन्ह देऊन कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. अनंत फडके उपस्थित होते. या प्रसंगी समितीचे सचिव व युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट, युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर, कॉ. अशोक मनोहर मित्र परिवार समितीचे खजिनदार कॉ. अनिल घाडगे व सर्व सदस्य, कामगार युनियनच्या संयुक्त चिटणीस कॉ. रोहिणी जाधव, कॉ. मधुकर नरसिंगे, उपाध्यक्ष कॉ. शोभा बनसोडे, कॉ. दिलीप कांबळे, कॉ. सुदाम गोसावी, कॉ. प्रकाश चव्हाण, कॉ. प्रकाश हुरकडली व इतर कायकर्ते उपस्थित होते.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

का दिला जातो कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा पुरस्कार
औद्योगिक व सर्व क्षेत्रातील कामगार चळवळीचे नेते व लाल निशाण पक्षाचे जनरल सेक्रेटरी कॉ. अशोक मनोहर यांनी तहयात कामगार चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले व कामगारांना न्याय मिळवून देण्याचा व त्यांच्या न्याय हक्कासाठी संघटितपणे कामगार संघटना उभ्या केल्या. या त्यांच्या कार्यातूनच लाल निशाण पक्ष स्थापन करण्यात सिंहाचा वाटा होता. त्यामुळे कॉ. अशोक मनोहर यांनी लाल निशाण पक्षाचे जनरल सेक्रेटरी म्हणून जबाबदारीने काम केले तसेच पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे मार्गदर्शक म्हणून कार्य केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मित्रपरिवाराने कॉ. अशोक मनोहर मित्र परिवार समिती स्थापण करून त्यांच्या स्मृती, विचार, कामगार चळवळीत केलेले योगदान व कार्याची ओळख चिरंतन राहावी शिवाय सर्व सामान्य कष्टकरी वर्गाच्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नवचैतन्य व नव उर्जा मिळावी यासाठी “कॉ. अशोक मनोहर युवा उर्जा ” प्रदान केला जातो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये