पुणे शहर

नागरिक व नगरसेवक यांच्यातील संवाद महत्वाचा – महापौर मुरलीधर मोहोळ

कोथरुड : pune city प्रभागातील विकास कामे योग्य पद्धतीने मार्गी लागावीत वा नागरिकांना अपेक्षित कामे व्हावीत यासाठी नगरसेवक व नागरिक यांच्यातील संवाद महत्वाचा आहे. प्रभागातील नागरिकांना नेमके काय हवंय ते समजून घेऊन त्याप्रमाणे विकासनिधी चा विनियोग केल्यास प्रभागात आवश्यक असलेल्या गोष्टींवर खर्च होईल व योग्य पद्धतीने विकास होईल असे मत महापौर मुरलीधर मोहोळ muralidhar mohol यांनी व्यक्त केले. Communication between citizens and corporators is important – Mayor Muralidhar Mohol

शिक्षण मंडळ अध्यक्ष, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या प्रयत्नातून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कारंज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महापौरांच्या हस्ते स्थानिक वृक्ष व महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हणं लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा शहर सरचिटणीस गायत्री भागवत, कोथरूड मंडल महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे, सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड प्राची बगाटे, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, महिला मोर्चा सरचिटणीस केतकी कुलकर्णी,पल्लवी गाडगीळ, यासह श्यामाप्रसाद उद्यानात दैनंदिन योग व अन्य क्रिया करणारे नागरिक उपस्थित होते. यावेळी कारंजे उभारणारे संतोष शिंदे व माळी शेटे तसेच उद्यान विभागाचे संदीप कापरे यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

IMG 20210707 WA0004

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या नावाने असलेल्या पटवर्धन बागेतील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात नागरिकांना आल्हाददायक वाटेल अश्या पद्धतीने हे नयनरम्य कारंजे उभारण्यात आले आहे. विविध विकासकामे करत असतानाच नागरिकांच्या मानसिक गरजा ही भागविल्या पाहिजेत वा त्यांना बागांमध्ये संचार करताना मनःशांती मिळावी या दृष्टीने प्रभागातील सर्व बागांमध्ये विविध विकास कामे केली असल्याचे खर्डेकर यांनी यावेळी सांगितले. नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक व संयोजन, संदीप खर्डेकर यांनी स्वागत तर प्राची बगाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये