भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो ; आदित्य ठाकरे यांच्यावरील टिकेनंतर नितेश राणे यांचे ट्विट
मुंबई : १२ भाजप आमदारांच्या निलंबना नंतर निषेध व्यक्त करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आक्षपार्ह विधान केले होते. या विधानावरून गोंधळ निर्माण झाला होता. परंतु आज नितेश राणे यांनी आपल्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करत माघार घेतली आहे. The word withdraws if the emotion is hurt. : Nitesh Rane
महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधी मंडळाच्या पायऱ्यांवर बसूनच भाजप आमदारांनी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.
In my yesterday’s speech outside the Vidhan Sabha in which I had mentioned about Aditya T which was wrongly understood by many.. if at all it has hurt any ones sentiments I take back my words.. didn’t mean to get too personal!
— nitesh rane (@NiteshNRane) July 7, 2021
आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? यासाठी त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वादग्रस्त आणि आक्षेपाचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे.




